पारद येथील शेतकर्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 3, 2014 20:52 IST2014-06-03T19:17:50+5:302014-06-03T20:52:50+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

पारद येथील शेतकर्याची आत्महत्या
मूर्तिजापूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील पारद येथील एका शेतकर्याने शनिवार, ३१ मे रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान मंगळवार, ३ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, पारद येथील रामराव महादेवराव तायडे (वय ५०) यांच्याकडे २० ते २५ एकर जमीन असून, गत तीन ते चार वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी संततधार पावसामुळे त्यांचे खरीप पीक पूर्णत: वाहून गेले होते. गारपिटीमुळे रब्बी पीकही हातचे गेले. त्यामुळे त्यांच्यावर बँकेचे कर्ज वाढत केले. यावर्षीचा पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना त्यांच्या हातात काहीच नसल्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे ३१ मे रोजी सायंकाळी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी रामराव यांना तातडीने मूर्तिजापूर येथील ल. दे. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अकोला येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ३ जून रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. रामराम तायडे हे पारदचे माजी सरपंचही होते.