महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: July 14, 2017 01:10 IST2017-07-14T01:10:57+5:302017-07-14T01:10:57+5:30
अकोट : आजाराला कंटाळून व मानसिक स्थिती ठीक नसल्याने ३८ वर्षीय स्मिता धनंजय मेतकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना १३ जुलै रोजी सकाळी ११ पूर्वी घडली.

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : आजाराला कंटाळून व मानसिक स्थिती ठीक नसल्याने ३८ वर्षीय स्मिता धनंजय मेतकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना १३ जुलै रोजी सकाळी ११ पूर्वी घडली.
पोलीस सूत्रानुसार, रुईखेड येथील धनंजय जगन्नाथ मेतकर हे मुलांच्या शिक्षणानिमित्त स्थानिक श्रीकृष्ण मुक्ताई संकुलमधील कुटुंबासह राहतात. १३ जुलै रोजी दोन्ही मुले शाळेत गेली होती, तर पती धनंजय मेतकर हे नगर परिषदेमध्ये कामाकरिता गेले होते. तेथून रुईखेड येथील शेतात जाण्यापूर्वी जेवणाचा डबा घेण्याकरिता घरी आले असता घराच्या दरवाजाची बेल वाजविली. दरवाजा न उघडल्याने त्यांनी स्वत:जवळील चावीने दरवाजा उघडला. आतमध्ये गेल्यानंतर बेडरूममध्ये पत्नी स्मिता हिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन खाली पडलेल्या स्थितीत आढळून आली. याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा व शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी धनंजय मेतकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.