तारफैलातील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 2, 2017 01:43 IST2017-06-02T01:43:24+5:302017-06-02T01:43:24+5:30
अकोला : घरात कुणीतरी व्यक्ती रागावल्याने, १६ वर्षीय मुलाने पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

तारफैलातील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : घरात कुणीतरी व्यक्ती रागावल्याने, १६ वर्षीय मुलाने पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
तारफैल सिद्धार्थवाडीत राहणारा अजय राजेंद्र नितोने (२४) याच्या तक्रारीनुसार, त्याचा भाऊ आकाश कैलास नितोने (१६) याला गुरुवारी सकाळी घरातील कुणीतरी रागावले. बोलण्याचा राग आल्याने, आकाशने घरात कुणी नसताना, पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु आकाशने आत्महत्या का केली, याची माहिती कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांना दिली नाही. पोलीस तपास करीत आहेत.