शेतकºयाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:19 IST2017-08-26T00:19:35+5:302017-08-26T00:19:35+5:30
सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुलां-मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, या चिंतेतून शहरातील दत्तनगरातील एका ४० वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी उघडकीस आली़

शेतकºयाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू: सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुलां-मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, या चिंतेतून शहरातील दत्तनगरातील एका ४० वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी उघडकीस आली़
दत्तराव काशिनाथ केकान (वय ४० वर्षे) असे शेतकºयाचे नाव आहे़ दत्तराव काशिकनाथ केकान यांना तालुक्यातील चिखलठाणा येथे ७ एकर शेती आहे़ त्यांच्यावर स्टेट बँक आॅफ इंडियाचे कर्ज होते़
सततच्या नापिकीमुळे मुलांमुलीचे शिक्षण कसे करायचे याची चिंता त्यांना होती़ यातूनच दत्तराव काशिनाथ केकान यांनी सेलू येथील दत्तनगरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे़
या घटनेची सेलू पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, दत्तराव केकान यांच्या नावावर किती रुपयांचे कर्ज होते, याची माहिती मात्र समजू शकली नाही़