अकाेला : कृषी नगरमधील युवकाची गळफास घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:07 IST2020-12-19T17:05:03+5:302020-12-19T17:07:11+5:30
आकाश वानखडे या युवकाने शनिवारी दुपारी अचाणक राहत्या घरात गळफास लाउन आत्महत्या केली.

अकाेला : कृषी नगरमधील युवकाची गळफास घेउन आत्महत्या
ठळक मुद्देआकाश वानखडे यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समाेर आले नाही.पाेलीसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद करून तपास सुरु केला आहे.
अ ाेला : सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी नगर येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी पाेलीसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद करून तपास सुरु केला आहे. कृषी नगर येथील रहीवासी आकाश वानखडे या युवकाने शनिवारी दुपारी अचाणक राहत्या घरात गळफास लाउन आत्महत्या केली. या घटनेची माहीती परिसरातील नागरिकांनी सिव्हील लाइन्स पाेलीसांना देताच पाेलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला. आकाश वानखडे यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समाेर आले नाही. मात्र पाेलीसांनी त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.