विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:17 IST2021-02-24T17:17:39+5:302021-02-24T17:17:46+5:30
Crime News विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अगरवेस येथील रहिवासी एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अगरवेस येथील एका विवाहित महिलेने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ हे घर न उघडल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आवाज दिला असता आतून कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिकांनी आतमध्ये प्रवेश केला असता विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती तातडीने डाबकी रोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.