मुर्तीजापूर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 17:07 IST2022-07-06T17:07:20+5:302022-07-06T17:07:30+5:30
Farmer suicide : विठ्ठल रमेश चौके असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मुर्तीजापूर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
मूर्तिजापूर : तालुक्यातील खरब(ढोरे) येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील विहीरीतच आत्महत्या केल्याची घटना ५ जुलै मंगळवारी घडली. विठ्ठल रमेश चौके असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजता शेतात जातो, असे सांगून तो घरून निघून गेला रात्र झाली घरी परत न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला, नातेवाईकांना विचारणा करण्यात आली. कुठेही आढळून आले नसल्याने पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता शेताच्या बांधावर त्यांची चप्पल आढळून आल्याने संशय बळावला त्यामुळे विहिरीत शोध घेतला. मोटर पंपाच्या सहय्याने विहिरीतील पाणी काढल्यानंतर मध्यरात्रीदरम्यान विहीरीतून विठ्ठल चौकेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
वडीलांचे छत्र यापूर्वीच हरविलेल्या विठ्ठलच्या नावे सामायिकात तीन एकर शेती आहे. शेतीवर बँकेचे ९० हजार रुपये कर्ज आहे. एक मुलगा व एक मुलगी आशा दोन आपत्यांना पोरकं करून गेलेल्या विठ्ठलच्या कुटुंबात पत्नी, भाऊ, वहिणी आहेत.