मृतक महिलेच्या भावाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रदीप देवीदास काळे, सासरे देवीदास पांडुरंग काळे, सासू मैनाबाई देवीदास काळे यांनी लग्नातील आंदण, हुंडा, कमी दिला. या कारणावरून अनिता हिचा नेहमीच शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. पती प्रदीप काळे हा नेहमीच वाद घालून अनिताला मारहाण करत असे. माहेरी आलेल्या अनिताने वेळोवेळी सासरकडील मंडळींकडून होत असलेला त्रास माहेरच्यांना सांगितला; परंतु अनिता हिला माहेरचे लोक समजूत घालून सासरी पाठवीत होते. अनिताही दोन अपत्ये असल्याने, समजूतदारी दाखवून नांदावयास जात होती. अखेर अनिताने, पती, सासू-सासरे या तिघांच्याही त्रासाला कंटाळून अखेर जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. ३० जानेवारी रोजी अनिताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सासू-सासरे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने, अकोट ग्रामीण पोलिसांनी भावाच्या तक्रारीनुसार भा.दं.वि. कलम ४९८, ३०६(३४) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST