पातूर तालुक्यातील शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:10 IST2017-12-03T23:03:39+5:302017-12-03T23:10:37+5:30
पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे.

पातूर तालुक्यातील शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : तालुक्यातील अंबाशी येथील शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जांबरून शेतशिवारात ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन भिकाजी लठाड (४0) असे मृतक मजुराचे नाव आहे.
लठाड हे बुलडाणा जिल्ह्यातील बेलदूर या गावाचे रहिवासी होते. ते सात ते आठ वर्षांपासून आपल्या कुटुंबासह अंबाशी येथे राहत होते. कामानिमित्त ते या शेतातच कुटुंबासह राहत असत. रविवारी सकाळी त्यांच्या मेहुण्यासह सकाळी ८ वाजेपर्यंत जांब तोडून कामसुद्धा केल्याचे समजते; त्यानंतर विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. लठाड यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असून, आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. या घटनेप्रकरणी फिर्यादी दिलीप नामदेव ठाकरे रा. अंबाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.