पायगुण चांगला नसल्याचे टोमणे; नवविवाहितेने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:23 IST2019-10-20T14:23:06+5:302019-10-20T14:23:14+5:30
तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घरात राहू नको, घटस्फ ोट घेऊन तुझ्या वडिलांच्या घरी जा’ अशा प्रकारचे टोमणे मारत होते.

पायगुण चांगला नसल्याचे टोमणे; नवविवाहितेने केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखोंडा माहेर असलेल्या एका युवतीचा विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळीने तिचा पायगुण योग्य नसल्याचा आरोप करीत वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याने या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी तिच्या सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाखोंडा बु. येथील अरुण रामकृष्ण बोरेकर (५७) यांची मुलगी माधुरी हिचा विवाह सहा महिन्यांपूर्वी किरण रामेश्वर नारोडकर यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांनी माधुरी हिच्या सासºयाचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या मंडळीने सासºयाचे अपघाती निधनाचे कारण समोर करून तिला ‘तू अपशकुनी आहेस, तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घरात राहू नको, घटस्फ ोट घेऊन तुझ्या वडिलांच्या घरी जा’ अशा प्रकारचे टोमणे मारत होते. एवढेच नव्हे तर तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू केला होता. सासरच्या याच त्रासाला कंटाळून माधुरी किरण नारोडकर हिने १५ आॅक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आत्महत्या केली होती. या प्रकरणी १८ आॅक्टोबर रोजी अरुण बोरेकर यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी आरोपी पती किरण रामेश्वर नारोडकर, रंजना रामेश्वर नारोडकर आणि सुवर्णा भागीनकार या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ४९८ अ, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
(प्रतिनिधी)