२0 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:17 IST2017-12-17T23:16:24+5:302017-12-17T23:17:02+5:30
कुरूम : माना पो.स्टे. अंतर्गत असलेल्या शेलुबाजार येथे २0 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबरला सकाळी ७.00 वाजेदरम्यान शेलुबाजार शेतशिवारात घडली.

२0 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : माना पो.स्टे. अंतर्गत असलेल्या शेलुबाजार येथे २0 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबरला सकाळी ७.00 वाजेदरम्यान शेलुबाजार शेतशिवारात घडली.
शेलुबाजार येथील रहिवासी अनिकेत रामलाल राऊत (२0) याने शेलुबाजार शेतशिवारातील गोंदणच्या झाडाला सुतळी दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पो.स्टे. माना येथे ज्ञानेश्वर नामदेव राऊत यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. बाळकृष्ण नलावडे व पो.काँ. नीलेश इंगळे करीत आहेत.