विषबाधा की आत्महत्या संभ्रम कायम !

By Admin | Updated: August 29, 2016 01:34 IST2016-08-29T01:34:55+5:302016-08-29T01:34:55+5:30

मुगाच्या शेंगा खाल्ल्याने दोन मुलींचा झाला होता मृत्यू.

Suicidal confusion of poisoning persists! | विषबाधा की आत्महत्या संभ्रम कायम !

विषबाधा की आत्महत्या संभ्रम कायम !

अकोला दि. २८ : आदिवासी भागातील पोपटखेड येथील तिघी मैत्रिणींना शुक्रवारी मूंगाच्या शेंगा खाल्यानंतर त्यात दोघींचा मृत्यू झाला, तर त्यांची मैत्रीण लक्ष्मी रवी गावंडे हिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. पण ही विषबाधा की आत्महत्या संभ्रम अद्याप कायम आहे.
लक्ष्मी गावंडे हिच्या सांगण्यानुसार, साक्षी रंगारी आणि आरती उके या तिच्या बालमैत्रिणी. पोपटखेड येथील जिल्हा परिषद शाळेत सोबत शिकायच्या. सोबतच घरी यायच्या आणि आम्हा तिघींचेही एकमेंकीच्या घरी येणे, जाणे सुरू असायचे. २६ ऑगस्ट रोजी साक्षी रंगारी हिचे आई-वडील शेतात कामाला गेलेले होते. साक्षी हिने आरती आणि लक्ष्मीला घरी बोलावले. मैत्रिणी असल्याने, बर्‍याचदा एकमेंकींच्या घरी जेवायला जायच्या.
शुक्रवारीसुद्धा तिघींनी सोबत जेवण करायचे ठरविले. त्यांनी मूंगाची भाजी तिघी मैत्रिणींनी खाल्ली. भाजी-पोळी खाल्ल्यानंतर काहीवेळाने साक्षी व आरतीला मळमळ आणि उलट्या व्हायल्या लागल्या. पोटात दुखू लागले; परंतु त्यादरम्यान लक्ष्मीला कोणताही त्रास जाणवला नाही. तिने ही बाब गावातील काही लोकांना सांगितली. दोघींचेही आई-वडील घरी आल्यावर त्यांना अकोल्यातील दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीलाही मळमळ व उलट्या होऊ लागल्याने, तिलाही या दोघींच्या मागोमाग सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
उपचारादरम्यान लक्ष्मीच्या मैत्रिणी साक्षी रंगारी व आरती उके या दोघी दगावल्या. लक्ष्मीलाही डॉक्टरांनी अतिदक्षता कक्षात हलविले. लक्ष्मीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये हलविले. लक्ष्मीसोबत लोकमतने संवाद साधला, तेव्हा लक्ष्मीने आम्ही तिघीही मैत्रिणींनी मुगाच्या शेंगांची भाजी खाल्ल्यानंतरच मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्यांची तिसरी सोबती लक्ष्मीच्या प्रकृतीत सवरेपचारमध्ये सुधारणा होत असून, रविवारी तिने लोकमतजवळ घटनाक्रमाचा उलगडा केला. लक्ष्मीने, आम्ही तिघी मैत्रिणींनी मुगाच्या शेंगांची भाजी खाल्ल्याचे स्पष्ट केले. आत्या व वडिलांनीसुद्धा लक्ष्मीच्या बोलण्याशी सहमती दर्शविली.

Web Title: Suicidal confusion of poisoning persists!