लॉकडाऊन’ काळात जनतेला मदत करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:12 PM2020-03-28T15:12:29+5:302020-03-28T15:12:42+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत नागरिकांना मिळेल यासाठी तत्पर रहावे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 

Suggestions of Congress state president to help the public during lockdown | लॉकडाऊन’ काळात जनतेला मदत करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

लॉकडाऊन’ काळात जनतेला मदत करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

Next

अकोला : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी व आवश्यक ती मदत करण्यासाठी काँग्रेस प क्षाचे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करीत असल्याची व या मदतीचे स्वरूप वाढविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे.

        राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्य क्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारीजिल्हाध्य क्षखासदारआमदार व सर्व फ्रंटल व सेलचे अध्य क्ष यांना पत्र लिहून सर्वसामान्य जनतेला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी पदाधिका-यांना उद्देशुन लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे कीसर्वांना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत गरीब लोकांना अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गहू, तांदूळ, डाळ, औषधे आदी वस्तूंचे वाटप काँग्रेस पक्षाच्या वतीने केले पाहिजे. हे वाटप करताना अनावश्यक गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळलाच पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी छोटे गट करून सोशल मीडियाचा वापर करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेऊन हे काम करावे. शेतक-यांना शेतमालाची काढणी करताना, शेतमालाची विक्री करताना काही अडचणी आल्यास तपासून त्या मार्गी लावाव्यात. दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाचे संकलन करताना काही अडचणी येत असतील तर त्याही मार्गी लावाव्यात आणि शेतक-यांना मदत करावी. अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी आस्थापने, बांधकाम क्षेत्र, तात्पुरती कामे सर्व स्थगित केलेली आहे. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी. सर्व सरकारी आणि खासगी दवाखाने रुग्णांना व्यवस्थित आरोग्य सेवा देतील याचीही काळजी घेणे. प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन सुरु करावी.सोशल मिडीयाच्या माध्यमातून हेल्पलाईन क्रमांक जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचवावा. खासगी रूग्णालये बंद आहेत त्यामुळे प्रत्येक पेशंटला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे उदा. गर्भवती महिला, नवजात अर्भके, बालके, किमोथेरपी,डायलिलीसचे पेशंट,  ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देणे. गरिब लोकांना सॅनिटायझरचे वाटप करणे. आवश्यकता असेल त्यांना मास्कचे वाटप करावे. बेघर तसेच ज्यांच्या जेवण्याची सोय नाही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे. यासोबतच या कठिण काळात काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा व लोकसभा सदस्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून आपल्या मतदारसंघ आणि राज्यातील दवाखान्यांना कोरोनाचा मुकाबल्यासाठी सज्ज करण्यासाठी मदत करावी. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी आपल्या मतदारसंघात आणि राज्यात लोकांना मदत करणारे उपक्रम राबवावेत. जिल्हा काँग्रेसने ब्लॉक काँग्रेस कमिट्यांना सूचना देऊन केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली मदत नागरिकांना मिळेल यासाठी तत्पर रहावे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 

Web Title: Suggestions of Congress state president to help the public during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.