नातीच्या आत्महत्येच्या दु:खाने आजीचाही मृत्यू

By Admin | Updated: June 6, 2014 22:37 IST2014-06-06T20:06:32+5:302014-06-06T22:37:11+5:30

दु:ख असह्य झालेल्या आजीने नातीच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी आपले प्राण सोडल्याची हृदयद्रावक

Sufferings of grandchildren are also caused by the death of grandmother | नातीच्या आत्महत्येच्या दु:खाने आजीचाही मृत्यू

नातीच्या आत्महत्येच्या दु:खाने आजीचाही मृत्यू

मूर्तिजापूर: नातीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे दु:ख असह्य झालेल्या आजीने नातीच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी आपले प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना मूर्तिजापूर येथील शिवाजीनगरात घडली आहे.
मूर्तिजापूरच्या शिवाजीनगरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील पाठक यांच्या तीन मुलीपैकी सर्वात मोठी मुलगी सुवर्णा हिचे लग्न १० जून रोजी होणार होते. त्यानुसार खरेदीही सुरू होती. मंगळवार, ३ जून रोजी सुवर्णाने तिच्या बहिणीसोबत कपड्यांची खरेदीही के ली. त्याच रात्री जेवण करून सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपले; दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी सुवर्णाचा खाक झालेला मृतदेहच घरच्यांना आढळला. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली. सुनील पाठक यांच्या सासू आणि सुवर्णाची आजी प्रमिला चांभारे यांची नातीचे लग्न पाहण्याची मोठी इच्छा होती. त्यामुळे सुवर्णाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसला आणि दुसर्‍या दिवशी गुरुवार, ५ जून रोजी याच धक्क्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे पाठक आणि चांभारे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Sufferings of grandchildren are also caused by the death of grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.