सोयी-सुविधांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करा!

By Admin | Updated: December 26, 2014 01:07 IST2014-12-26T01:07:14+5:302014-12-26T01:07:14+5:30

जे.पी.डांगे यांचे निर्देश: अधिकार्‍यांची घेतली बैठक.

Submit a Fund Proposal for Facilities | सोयी-सुविधांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करा!

सोयी-सुविधांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करा!

अकोला : येत्या पाच वर्षांत नागरी भागात करावयाची पायाभूत सोयी-सुविधांची कामेआणि त्यासाठी लागणार्‍या निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांना दिले.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अधिकार्‍यांच्या बैठकीत कुळकर्णी बोलत होते. जिल्ह्यातील नगरपालिकांमार्फत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. येत्या पाच वर्षांत करावयाच्या पायाभूत सोयी-सुविधांविषयक कामांचे नगरपालिकांमार्फत करण्यात आलेले नियोजन आणि या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबतचे प्रस्ताव राज्य वित्त आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना डांगे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी पी. यू. गिरी यांच्यासह जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर या पाचही नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

*मनपा नियोजनाची घेतली माहिती!
महानगरपालिकामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि करण्यात येत असलेली विकासकामे यासंदर्भात राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी माहिती घेतली. येत्या पाच वर्षात शहरात करावयाची सोयी-सुविधांची कामे व त्यासाठी लागणारा निधी याबाबत मनपा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीदेखील त्यांनी घेतली.
* डीपीसी योजनांचा घेतला आढावा!
जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी घेतला. जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांसह तेरावा वित्त आयोग, ग्रामदान योजना यासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा नियोजन विभागाला दिले.

Web Title: Submit a Fund Proposal for Facilities