पीक नुकसानाचा अहवाल सादर करा! - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:54 PM2019-10-29T12:54:33+5:302019-10-29T12:54:40+5:30

अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना दिला.

Submit a Crop Damage Report! - Order of the Collector | पीक नुकसानाचा अहवाल सादर करा! - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पीक नुकसानाचा अहवाल सादर करा! - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Next

अकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर पीक नुकसानाची पाहणी करून, प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना सोमवारी दिला.
पावसाळा संपला असला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. रविवार, २७ आॅक्टोबर रोजीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, सोमवार, २८ आॅक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने कापणी व काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी करून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाºयांना दिला.

पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा !
परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाच्या पृष्ठभूमीवर, पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुका कृषी अधिकाºयांकडे विहित नमुन्यात अर्ज करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी केले आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुुकसान झाले आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाची पाहणी करून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना दिला आहे.
-संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

 

Web Title: Submit a Crop Damage Report! - Order of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.