शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 5:20 PM

शिष्यवृत्ती योजनेची तारीख वाढवण्यात यावी, अशी पालकवर्गाकडून मागणी होत आहे.

अकोला : समाज कल्याण विभागातर्फे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील(ओबीसी)विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आहे; परंतु विद्यार्थी, पालकांना या शिष्यवृत्तीची माहितीच नसल्याने, यंदा शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शिष्यवृत्तीपासून आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखल्यासारखे कागदपत्रे गोळा करण्यात अडचणी येत आहेत. या शिष्यवृत्ती योजनेची तारीख वाढवण्यात यावी, अशी पालकवर्गाकडून मागणी होत आहे.इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारतर्फे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने शिक्षण विभागाला दिल्या आहेत; मात्र शिक्षण विभागाने या प्रस्तावाची अंमलबजावणी गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांना, याबाबत कोणत्याही प्रकारच्या लेखी सूचना दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमधून विद्यार्थी, पालकांना शिष्यवृत्तीबाबत सूचना देण्यात आल्या नाहीत, तसेच ज्यावेळी पालकांना सूचना मिळाल्या. त्यावेळी शिष्यवृत्तीची तारीख अगदी तोंडावर असल्याने, एवढ्या कमी वेळात शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करणे शक्य नसल्याने, पालकांना शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. काही शाळांना याबाबतची माहिती उशिरा प्राप्त झाल्याने पालकांची कागदपत्र गोळा करण्यासाठी धांदल उडाली आहे. शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची तारीख १६ मार्च २0२0 होती; परंतु अनेक पालकांना याबाबत दोन दिवस अगोदर सूचना मिळालेल्या असल्याने त्यांना कागदपत्रे गोळा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या शिष्यवृत्तीपासून हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत या प्रस्तावाची मुदत वाढवण्याची मागणी पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीAkolaअकोलाStudentविद्यार्थी