विद्यांचल द स्कूलचे विद्यार्थी एनटीएस परीक्षेत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:49+5:302021-07-02T04:13:49+5:30

विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २४ जूनला घेण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विज्ञान मंच अकोला समन्वयक डॉ. रवींद्र भाष्कर, गट ...

Students of Vidyanchal The School pass the NTS exam | विद्यांचल द स्कूलचे विद्यार्थी एनटीएस परीक्षेत उत्तीर्ण

विद्यांचल द स्कूलचे विद्यार्थी एनटीएस परीक्षेत उत्तीर्ण

विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २४ जूनला घेण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विज्ञान मंच अकोला समन्वयक डॉ. रवींद्र भाष्कर, गट शिक्षणाधिकारी विजय हाडोळे, नायब तहसीलदार हरीश गुरव, विज्ञान शिक्षक संघ उपाध्यक्ष अनंत लंके, विज्ञान शिक्षक संघ सचिव मनीष निखर्डे, नर्सिंग कन्या शाळा प्राचार्या वंदना उंबरकर, संस्थेचे अध्यक्ष नरेश भुतडा, कार्यकारी संचालक दिनेश भुतडा, सचिव सारिका भुतडा, सदस्य राजेश भुतडा, संदीप बुब, प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी, प्रशासकीय संचालक प्रशांत विनायक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये रवींद्र रमतकर, संचालक राज्य विज्ञान संस्था नागपूर आणि अनिल गुंजाळ, उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे आभासी अतिथी म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जुळले होते. प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी आणि स्पर्धा परीक्षा समन्वयक वैभव राऊत यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मनोज शर्मा यांनी केले. आभार प्रदर्शन स्नेहल पाटील यांनी, नियोजन प्रीती झुनझुनवाला यांनी केले.

फोटो:

Web Title: Students of Vidyanchal The School pass the NTS exam