शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:20 IST

अकोला: विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह एनएसयूआयने जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्देकान्हेरी येथील पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी २0१७ व १८ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेतला.सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कॉलेजचे प्रशासन कोणतेही कारण न सांगता, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगत आहे. नर्सिंग कॉलेजच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अकोला: खडकीजवळील पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये २0१७ व १८ सत्रासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करून तासिकांना हजेरी लावली. विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह एनएसयूआयने जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे केली आहे.कान्हेरी येथील पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी २0१७ व १८ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेतला. वर्षभर तासिकांना हजेरी लावून अभ्यास केला. परीक्षेचे अर्ज आणि शुल्क भरले. कॉलेजनेसुद्धा विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वीकारले. जून महिन्यात विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे; परंतु कॉलेज प्रशासन काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास नकार देत असल्याने, विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कॉलेजचे प्रशासन कोणतेही कारण न सांगता, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना जाब विचारल्यावर, प्राचार्य उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. नवीन शासन निर्णय आला आहे. परीक्षा शुल्काची अडचण निर्माण झाली. तसेच प्रवेश अर्ज उशिरा पोहोचले, अशी कारणे प्राचार्य सांगत आहेत आणि परीक्षेला बसण्यास विद्यार्थ्यांना नकार देत आहेत. नर्सिंग कॉलेजच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी, तक्रारीची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तक्रार देणाºया शिष्टमंडळात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, नर्सिंगचे विद्यार्थी अभिजित टेकाडे, आकाश वानखडे, अनुरूप उगले, अर्जुन वºहाडे, अश्विनी गवई, भारती गीते, कल्याणी वाघमारे, मनीषा अघडते, मोहन नेमाडे, निकिता जावरे, पायल शिरसाट, प्रतीक मुरकुटे, प्रतीक कापनकर, प्रतीक्षा चव्हाण, रोहन माकोडे, रोशन कोगदे, ऋषिकेश शेगोकार, साक्षी भांबुरकर, साक्षी बागडे, शंतनु बोरकर, श्वेता मनवर, शिवाली बाठे, श्रद्धा वाघमारे, प्रतीक्षा साबळे, चैतन्य इंगळे, दौलत गावंडे, खुश्नुमा खान, हर्षदा जाधव, विनय जामोदे, विशाखा वासनिक, कृतिका गव्हाळे आदींचा समावेश आहे.

डीएमईआरतर्फे १५ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांचे नर्सिंगला प्रवेश घेतले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते, तसेच विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे परीक्षा अर्ज नाकारल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी आमचा विद्यापीठासोबत पत्रव्यवहार सुरू आहे; परंतु एका विद्यार्थी संघटनेचा नेता विद्यार्थ्यांना हाताशी धरून खंडणी मागण्यासाठी ही उठाठेव करीत आहेत. त्याची तक्रार करणार आहे.- अ‍ॅड. वैशाली वालचाळे, सचिव, पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Ruralअकोला ग्रामीणStudentविद्यार्थीexamपरीक्षा