शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

विद्यार्थ्यांना मिळेना ‘स्वाधार’चा ‘आधार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:05 PM

विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासनामार्फत निधी प्राप्त झाला नसल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्त्याचे वितरण रेंगाळले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येते; परंतु २०१९-२० यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी शासनामार्फत अद्याप निधी प्राप्त झाला नाही.निधीअभावी अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण रेंगाळले आहे. त्यानुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय निधी केव्हा प्राप्त होणार आणि विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यासाठी हवे ८ कोटी!डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात अकोला जिल्ह्यातील २ हजार ३१ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता वितरित करण्यासाठी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत ८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता देण्यासाठी ८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.- अमोल येवलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीgovernment schemeसरकारी योजना