शिष्यवृत्ती परीक्षेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची मारली बाजी
By Admin | Updated: July 31, 2014 02:09 IST2014-07-31T01:55:03+5:302014-07-31T02:09:31+5:30
अकोला शहरातील २0 विद्यार्थ्यांनी अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांची मारली बाजी
अकोला : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता चवथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील २0 विद्यार्थ्यांनी अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
चवथ्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत निरज मालोकार हा जिल्हय़ातून सहावा, सातव्या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत निरज गवळी हा जिल्हय़ातून पंधरावा येण्याचा मान मिळविला आहे. तसेच निखील जोशी, राशी फिरके, अंशीता भोसले, राधिका खंडेलवाल, सोहम गावंडे, हर्ष गावंडे, दक्ष पवार, वंश लोडाया, रिद्धी सोमाणी, निधी जैन, अथर्व चोभे हा तृतीय, तर योगिता मगर, सुमेध कुळकर्णी, हर्ष शर्मा यांनी अव्वल स्थान पटकाविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा कैलास नगरातील गौरक्षणच्यावतीने २८ जुलै रोजी न्यु इंग्लिश विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कमलाकर कविश्वर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते