विद्यार्थ्याने केली प्राध्यापकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:39 IST2017-08-10T20:38:34+5:302017-08-10T20:39:05+5:30

Student kills fellow professor | विद्यार्थ्याने केली प्राध्यापकास मारहाण

विद्यार्थ्याने केली प्राध्यापकास मारहाण

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद कॉलेजमधील घटना आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील एका प्राध्यापकास ९ आॅगस्ट रोजी मारहाण केल्याच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक सिद्धार्थ आनंदराव वाघमारे (२८) हे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते. यावेळी मो. सोहेल मो. जहीर हा विद्यार्थी वर्गाच्या दरवाजाबाहेर मोबाइलवर मित्रांसोबत गाणे वाजवित होता. त्यामुळे शिकविण्यास त्रास होत होता म्हणून प्रा. वाघमारे यांनी या विद्यार्थ्यास दटावले असता, मो.सोहेलने त्यांच्या पोटामध्ये लाथ मारली, तसेच तोंडावर मारहाण केली. फिर्यादी सिद्धार्थ वाघमारे यांच्या तक्रारीवरून आरोपी विद्यार्थी मो. सोहेल मो. जहीरविरुद्ध भादंविच्या अनुसूचित जाती-जमाती अधिनियमानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.

Web Title: Student kills fellow professor