रस्त्यांवर सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:07+5:302021-05-07T04:19:07+5:30
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या ...

रस्त्यांवर सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या १५ व्यावसायिक व विनामास्क फिरणाऱ्या ४४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाई करणाऱ्या पथकाने शहरातील इतरही भागात फेरफटका मारणे आवश्यक झाले आहे. अकोट शहरात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता मुभा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर दुपारी शहरातील रस्त्यांवर मात्र शुकशुकाट पसरत आहे. दरम्यान ६ मे रोजी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ जणांजवळून महसूल, पोलीस व नगर परिषद पथकाने ३७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यामधे १५ दुकानदारांजवळून प्रति १ हजार रुपये तर विनामस्क फिरणाऱ्या ४४ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला. दरम्यान, शहरातील काही भागात रात्री उशिरापर्यंत काही दुकाने व विविध खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.