मच्छी मार्केटमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST2021-03-08T04:18:59+5:302021-03-08T04:18:59+5:30

चारजण जखमी, उपचार सुरू अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट येथे जागेच्या वादावरून दोन गटांत तुफान ...

Storm clashes between two groups at a fish market | मच्छी मार्केटमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी

मच्छी मार्केटमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी

चारजण जखमी, उपचार सुरू

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट येथे जागेच्या वादावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या हाणामारीत चारजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोहम्मद अली रोडवरील मच्छी मार्केटमध्ये मच्छी व्यावसायिक हुसेन खान इस्माईल खान आणि कालू मच्छीवाले या दोघांमध्ये जागेच्या कारणावरून वाद झाले. या वादात महिला व युवकांनीही उडी घेतल्यानंतर शिवीगाळ व हाणामारी सुरू झाली. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. ही माहिती सिटी कोतवाली पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, दोन्ही गटांतील महिला व युवकांनी पोलिसांसमोर दगडफेक व हाणामारी सुरू ठेवली. या हाणामारीत चारजण जखमी झाले असून पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी दोघांनीही परस्परांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. या दोन्ही गटांतील युवक एकमेकांचे नातेवाईक असून जागेच्या वादातून तसेच पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा तपास सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव करीत आहेत.

Web Title: Storm clashes between two groups at a fish market