चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:21 IST2017-12-05T02:15:30+5:302017-12-05T02:21:28+5:30

युवतीच्या हरविलेल्या मोबाइलवरून तिच्याच मैत्रिणीला अज्ञात व्यक्तीने अश्लील छायाचित्रे पाठविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Stolen mobile photos from mobile phones stolen! | चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे!

चोरीला गेलेल्या युवतीच्या मोबाइलवरून पाठविली अश्लील छायाचित्रे!

ठळक मुद्देअज्ञात आरोपीचे कृत्ययुवतीच्या मैत्रिणीला पाठविली अश्लील छायाचित्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: युवतीच्या हरविलेल्या मोबाइलवरून तिच्याच मैत्रिणीला अज्ञात व्यक्तीने अश्लील छायाचित्रे पाठविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
जठारपेठेतील ज्योती नगरात राहणार्‍या एका युवतीचा स्मार्टफोन बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळील शिकवणी वर्गामध्ये २७ नोव्हेंबर रोजी चोरीला गेला. मोबाइल चोरणार्‍या व्यक्तीने युवतीच्या स्मार्टफोनच्या आधारे तिच्या एका मैत्रिणीच्या व्हॉट्स अँपवर काही अश्लील छायाचित्रे पाठविली. त्यामुळे  मैत्रिणीने युवतीकडे तक्रार करीत, तिला चांगलेच खडसावले; परंतु युवतीने तिचा मोबाइल चोरीला गेल्याचे तिला सांगितल्यावर, दोघींनी सोमवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. युवतीच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३५४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Stolen mobile photos from mobile phones stolen!