डाबकी रोडवरील घरातून दारूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST2021-02-25T04:22:44+5:302021-02-25T04:22:44+5:30

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चहाच्या कारखाना परिसरात एक युवक घरातून देशी व विदेशी दारूची विक्री ...

Stocks of liquor seized from a house on Dabki Road | डाबकी रोडवरील घरातून दारूचा साठा जप्त

डाबकी रोडवरील घरातून दारूचा साठा जप्त

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चहाच्या कारखाना परिसरात एक युवक घरातून देशी व विदेशी दारूची विक्री करीत असल्याच्या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून २० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला.

चहाचा कारखाना परिसरातील रहिवासी अजय नामदेव भिलंगे हा देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी तातडीने छापा टाकून अजयच्या घराची झडती घेतली असता २०४ बॉटल दारूचा साठा जप्त करण्यात आला. या दारूची किंमत सुमारे वीस हजार रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अजय भिलंगे याच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stocks of liquor seized from a house on Dabki Road