एमआयडीसीतील हॉटेलमधून दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:45 IST2021-06-08T17:45:14+5:302021-06-08T17:45:22+5:30
Stocks of liquor seized : याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीतील हॉटेलमधून दारूचा साठा जप्त
अकोला : ट्रांसपोर्ट नगरमध्ये असलेल्या एका हॉटेलमधून एमआयडीसी पोलिसांनी विदेशी दारूचा साठा सोमवारी रात्री उशिरा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर परिसरातील अंबिकानगर येथील रहिवासी छोटूसिंग बायस यांचे ट्रांसपोर्ट नगर मध्ये हॉटेल असून या हॉटेलमधून देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छोटूसिंग बायस याच्या हॉटेलमध्ये छापा टाकून सुमारे १५ हजार रुपयांचा विदेशी दारुचा साठा जप्त केला.