शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 10:14 AM

तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगत आठवड्यात आतापर्यंत साधारणपणे चार हजार ५०० दुकानांची तपासणी केली आहे. ५० जणांविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

- सचिन राऊत

अकोला : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर मोठ्या संकटातून राज्याची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु असली तरी काही समाजकंटकांनी अशा संकटाच्या काळातही सॅनिटायजर आणि मास्कचा काळाबाजार आणि गौरखधंदा सुरु करताच अन्न व औषध प्रशासन विभागाने गत आठवड्यात राज्यभर धाडसत्र राबवित साडेचार हजार औषध दुकानांची तपासणी केली. यामध्ये तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाने गत आठवड्यात आतापर्यंत साधारणपणे चार हजार ५०० दुकानांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये मिळालेल्या माहितीवरून राज्यातील ३२ ठिकाणी धाडी टाकून ५० जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मास्कची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी आणि अप्रमाणित सॅनिटायजरचा काळाबाजार केल्यामुळे या ५० जणांविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या कारवायांमध्ये १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच मुदतबाह्य औषधांची विक्री सुरू असल्याचेही या तपासणीत समोर आले असून, अवैधरीत्या मास्कची विक्री करणाऱ्यांवरही या तपासणीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. काळाबाजार आणि बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाईसाठी तक्रारी करण्यात आल्या आहेत. जप्त केलेले सॅनिटायजर अप्रमाणितराज्यभर केलेल्या कारवायांमधून तब्बल दीड कोटी रुपयांचे सॅनिटायजर्स जप्त केले आहे. त्यानंतर या सॅनिटायजर्सचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, यामधील बहुतांश सॅनिटायजर्सचा फार्म्युला योग्य नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.----------------------मुदत संपलेल्या सॅनिटायजर्स व औषधांची विक्री!छापेमारीत सॅनिटायजर्ससह काही औषधांची मुदत संपलेली असतानाही त्यांची विक्री बिनबोभाट सुरू असल्याचे उघडकीस आले. अशा दुकानदारांचीही यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. अवैधरीत्या मास्क विक्री करणाºया सहा जणांवर कारवाईराज्यातील सहा दुकानदार अवैधरीत्या मास्क विक्री करीत असल्याचे आढळले. या सहा औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच काही जण प्रमाणित नसलेल्या कापडाचे एक तसेच दोन थरांचे मास्क बनवून विकत असल्याचेही या तपासणीत समोर आले. या शहरांमध्ये धाडसत्रमास्क आणि सॅनिटायजर्सचा मोठ्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमधील औषध दुकाने व काही अड्ड्यांवर अशा एकूण ३२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFDAएफडीएCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस