परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ‘एलटीए ’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:42 PM2020-06-26T12:42:43+5:302020-06-26T12:43:45+5:30

बड्या अधिकाºयांचे किाही भत्ते आणि प्रवास रजा (एलटीए) बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

State Transport officials LTA closed | परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ‘एलटीए ’ बंद

परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ‘एलटीए ’ बंद

googlenewsNext

- सचिन राऊत

अकोला : राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या वर्ग एक आणि दोनच्या अधिकाºयांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला असून, या बड्या अधिकाºयांचे किाही भत्ते आणि प्रवास रजा (एलटीए) बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या या अधिकाºयांना दोन वर्षातून मिळणारे २४ हजार आणि ४ वर्षातून मिळणारे ४८ हजार रुपयांचा भत्ता मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील सर्वच शासकीय आणि खासगी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तब्बल तीन महिने एसटी बसेस बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळालाही कोट्ट्यवधींचा फटका बसला. या आर्थिक संकटात फसलेल्या एसटीच्या चाकांना पुन्हा गती देण्यासाठी परिवहन महामंडळाने काटकसरीचे धोरण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग एक आणि दोन या पदावर असलेल्या अधिकाºयांना दरवर्षी मिळणारी प्रवासी रजा आणि चैनीचा भत्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या राज्यातील ५०० पेक्षा अधिक अधिकाºयांना याचा फटका बसणार आहे. या भत्त्यामध्ये महामंडळातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना सहलीसाठी सहकुटुंब जाण्याकरिता दोन वर्षाला २४ हजार रुपये आणि रजा देण्यात येत होती तर चार वर्षांसाठी ४८ हजार रुपये भत्ता आणि रजा मिळत होती; मात्र आता कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक नुकसान झालेल्या एसटी महामंडळाने एक-एक खर्च कमी करून यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आता यापुढे प्रवासासाठी असलेला चैनीचा भत्ता आणि सहकुटुंब फिरण्यासाठी देण्यात येत असलेली रजा मिळणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
 
राज्यातील ५७८ अधिकाºयांना फटका
राज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन या पदावर राज्यात तब्बल ५७८ अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाºयांना सहकुटुंब फिरण्यासाठी २४ हजार रुपये देण्यात येतात. यावर तब्बल कोट्ट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या संकटात या रजा बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी पावले उचलली. या प्रवासी रजेसोबतच यासाठी मिळणारा भत्ताही बंद करण्यात येणार असल्याने राज्यातील ५७८ अधिकाºयांना कोरोनाचा चांगलाच दणका बसल्याची माहिती आहे; मात्र त्यामुळे महामंडळाला नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

 

Web Title: State Transport officials LTA closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.