अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:50 PM2019-12-15T22:50:22+5:302019-12-15T22:51:30+5:30

कृषी प्रदर्शन होणार आहे.

State level agricultural demonstration in Akola | अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

googlenewsNext
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, संशोधन आदींसह आधुनिक शेती विषयावर शेतकºयांसाठी माहिती उपलब्ध करू न दिली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५९ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचे हीरकमहोत्सवी वर्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य विकास, पूरक व्यवसायातील, गट शेतीतील, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमुख माहितीचा खजिनाच यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, वनौषधी, फुलशेती, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर आधारित विविध विभागांची दालने तसेच इतर शासकीय, निमशासकीय, सेवाभावी, स्वयंसेवी, खासगी संस्थांचीसुद्धा दालने शेतकºयांचे मनोबल वाढविणार आहेत. तीन दिवस दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतशील शेतकºयांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनासोबतच मनोरंजनात्मक कलेतून समाजप्रबोधन करणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक सप्तखंजिरीसम्राट सत्यपाल महाराजांची सत्यवाणीआणि सुप्रसिद्ध हास्यसम्राट अ‍ॅड. अनंत खेळकर यांचे सादरीकरण उपस्थितांमध्ये नवचैतन्य भरणार आहेत.

Web Title: State level agricultural demonstration in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.