राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ; अकोला वकिल संघ 'अ' ची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:48 IST2018-11-18T16:47:25+5:302018-11-18T16:48:16+5:30

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले.

State-level Advocate Cup cricket tournament begins; Akola advocates 'A' winning salute | राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ; अकोला वकिल संघ 'अ' ची विजयी सलामी

राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ; अकोला वकिल संघ 'अ' ची विजयी सलामी

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत राज्यातील १२ जिल्हयातील वकिल संघ सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ महेन्द्र शाह होते. स्पर्धेतील पहिला सामना अकोला अ विरुध्द जळगाव किरण या संघात झाला.अकोला अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव किरण संघाने १५षटकात सर्वबाद ७७ धावा केल्या. अकोला अ संघाच्या वतीने राम परमार याने ४ गडी बाद करू न सामनावीर पुरस्कार मिळविला. अकोला अ संघातर्फे फलंदाज अतुल सराग याने शानदार फलंदाजी करीत ३३ काढल्या. रविकांत ठाकरे याने नाबाद १० धावांचे योगदान दिले. रूपेश इस्तापे याने नाबाद २५ धावा काढल्या. अकोला संघाने अवघ्या १३ षटकात लक्ष्य गाठून जळगाव किरण संघावर विजय मिळविला. सामन्यात पंच म्हणून राजेश दुधलम, गब्बर शर्मा यांनी काम पाहिले. गुणलेखन सागर अडोले यांनी केले. मैदान गडी म्हणून वैभव ठाकूर व सचिन देशमुख यांनी काम पाहिले.
या सामन्याच्या वेळी अ‍ॅड़ बी.के गांधी, अ‍ॅड .मुन्ना खान, अ‍ॅड सुरेंद्र व्यास,अ‍ॅड संतोष राऊत अ‍ॅड अजित देशपांडे, अ‍ॅड अमित डांगे ,अ‍ॅड दीपक काळपांडे. हर्षल वानखडे संतोष इंगळे शंकर ढोले संतोष वाघमारे सुनील देशमुख विनय आठवले दीपक पाटील अजय लोंढे डेनिस अघमकर राहुल धणोकर प्रफुल भारसाखरे ज्ञानेश उमरकर वैभव घुगे सागर डवले, सुहास राजदेकर,कारग्रुह अधीक्षक निर्मळ यांची उपस्तीती होती, अशी माहिती अ‍ॅड़ अजय लोंढे यांनी दिली.

 

Web Title: State-level Advocate Cup cricket tournament begins; Akola advocates 'A' winning salute