"जलयुक्त" योजनेच्या कामाला सुरुवात

By Admin | Updated: April 8, 2017 17:42 IST2017-04-08T17:42:38+5:302017-04-08T17:42:38+5:30

आगर येथील "जलयुक्त" शिवारच्या कामांना ८ एप्रिलला प्रारंभ करण्यात आला.

Start of the work of "Jalakit" scheme | "जलयुक्त" योजनेच्या कामाला सुरुवात

"जलयुक्त" योजनेच्या कामाला सुरुवात

आगर (जि. अकोला) : येथील जल युक्त शिवारच्या कामांना सरपंच निशा शिरसाट यांच्या ८ एप्रिलला प्रारंभ करण्यात आला.
चोंडा नाल्यावर नारळ फोडून कामाला प्रारंभ करण्यात आला. येथील शेत शिवारातील काम मार्गी लागतील या हेतुने आगर गाव जल युक्त योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. आक्टोंबर महीन्यात नाल्यावर कामास सुरुवात करण्यात येवून काम पूर्ण करण्यात आली होती. त्यावेळी चोंडा नाल्यावरील काम थांबले होते याबाबत लोकमत मधे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी स. अभियंता वागपाजर यांनी कामावर लक्ष देऊन लवकरच कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: Start of the work of "Jalakit" scheme