राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेला प्रारंभ

By Admin | Updated: August 23, 2014 23:16 IST2014-08-23T22:41:11+5:302014-08-23T23:16:16+5:30

धनुर्विद्या स्पर्धेला २३ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुलावर प्रारंभ झाला.

Start of state-level archery competition | राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेला प्रारंभ

वाशिम : वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या असोसिएशन वाशिम यांच्या व्दारा आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेला २३ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुलावर थाटात प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना यांच्या मान्यतेने वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या असोसिएशन वाशिम यांच्या व्दारा जिल्हा क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय मीनी सबज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा आयोजित केली आहे. २३ रोजी सकाळी या स्पर्धेत राज्यभरातून संघ सहभागी झाले. या स्पध्रेत एकूण तीन क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले. यात इंडियन, रिकव्हर व कंम्पाउंड अशा तिन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था संघटनेच्यावतीने करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, सचिव अनिल थडकर व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Start of state-level archery competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.