खिरकुंड बस सुरू करा, पणज ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:55+5:302021-02-05T06:13:55+5:30
आता शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु सकाळी शाळेत जाण्याकरिता सकाळची बस नसल्याने विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत आणि ...

खिरकुंड बस सुरू करा, पणज ग्रामस्थांची मागणी
आता शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु सकाळी शाळेत जाण्याकरिता सकाळची बस नसल्याने विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता उशीर होत आहे. विद्यार्थ्यांच्या वेळेवर बस येत नाही किंवा बस थांबा असूनसुद्धा बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सकाळची वडाळी बस ही पणज बसस्थानकावरून नेण्यात यावी. तसेच परतवाडा डेपोच्या अनेक बस पणज बस स्टाँपवर थांबत नसून विध्यार्थंचे नुकसान होत आहे. खिरकुंड बस सुरू करावी. जलद गतीने धावणाऱ्या बसला थांबा देण्यात यावा. वडाळी देशमुख येथे जाणारी बस पणज बस स्टाँपवरून सोडावी. अशा मागणीचे लेखी निवेदन कोट आगार प्रमुखांना सोमवारी देण्यात आले. यावेळी पणज ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदीप ठाकूर, नवनिर्वाचित सदस्य मधुकर कोल्हे, गजानन अकोटकर, संजय देशमुख, ओमप्रकाश शेंडे, दिनेश बोचे, पत्रकार अनिल रोकडे, रोशन राऊत, चेतन बोचे, संजय गवळी, पत्रकार नईम पटेल व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो