क्रीडा सप्ताहांतर्गत कुस्ती सामने

By Admin | Updated: December 18, 2014 00:48 IST2014-12-18T00:48:18+5:302014-12-18T00:48:18+5:30

क्रीडा सप्ताहांतर्गत कुस्तीचे प्रदर्शनीय सामने; १४ कुस्तीगीरांचा सहभाग.

Sports Weekend Wrestling Front | क्रीडा सप्ताहांतर्गत कुस्ती सामने

क्रीडा सप्ताहांतर्गत कुस्ती सामने

अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुस्ती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत कुस्तीचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये १४ कुस्तीगीर सहभागी झाले होते. नितीन वाणी, सुरेंद्र सिरसाट, सौरभ खंडारे, सैफ शेख, महेश जाधव, मनीष इंगळे, आकाश इंगळे, मो. इमरान, मो.साबीर, मयूर सावळे, अब्दुल जाकीर, आकाश साठे, अक्षय सिरसाट यांनी पारंपरिक व तंत्रशुद्ध कुस्तीचे प्रदर्शन केले. प्रदर्शनी सामन्यांमध्ये सुरेंद्र, सौरभ, सैफ, मनीष, आकाश इंगळे, मो.साबीर, आकाश साठे, अक्षय विजयी ठरले. कार्यक्रमाला शहरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Sports Weekend Wrestling Front