बोरगावात मॅरेथॉन स्पर्धेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:18 IST2021-09-13T04:18:49+5:302021-09-13T04:18:49+5:30

बोरगाव मंजू : नेहरू युवा केंद्रातर्फे ‘मी बोरगाव धावतो’या अभिनव उपक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी सकाळी आयोजन केले होते. या ...

Spontaneous participation of youth in marathon competition in Borgaon | बोरगावात मॅरेथॉन स्पर्धेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

बोरगावात मॅरेथॉन स्पर्धेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

बोरगाव मंजू : नेहरू युवा केंद्रातर्फे ‘मी बोरगाव धावतो’या अभिनव उपक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी सकाळी आयोजन केले होते. या स्पर्धेत युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

बोरगाव मंजू येथे बसथांबा ते रेल्वे स्थानकापर्यंत एक किमी अंतरावर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अध्यक्ष देवानंद मोहोड, नेहरू युवा केंद्राचे प्रशिक्षक हरीओम राखोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. ‘मी बोरगाव धावतो’ स्पर्धकांनी एक किलोमीटरचे अंतर असलेला मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य अवचार, द्वितीय क्रमांक पवन गवई, तर तृतीय कपिल बागडे यांनी पटकाविला. विजयी धावपटूंना नेहरू युवा केंद्राच्यावतीने पारितोषिक, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्रांच्या अध्यक्षा नम्रता आठवले, सृष्टी बागडे आदींनी सहयोग दिला.

Web Title: Spontaneous participation of youth in marathon competition in Borgaon