शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्पिरिट खरेदी-विक्री करणार्‍यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:59 IST

अकोला : छत्तीसगड येथून निघालेला आणि गोवा येथे जात असलेला रेक्टीफाइड आरएस नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेला स्पिरिटचा ट्रक बुधवारी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्यानंतर या स्पिरिटची विक्री करणारा व खरेदी करणार्‍याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचालक-क्लीनर पोलीस कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्तीसगड येथून निघालेला आणि गोवा येथे जात असलेला रेक्टीफाइड आरएस नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेला स्पिरिटचा ट्रक बुधवारी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्यानंतर या स्पिरिटची विक्री करणारा व खरेदी करणार्‍याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या चालक व क्लीनरला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. छत्तीसगड येथील केए 0१ बी ६२८१ क्रमांकाचा रेक्टीफाइड स्पिरिटचा एक टँकर तब्बल १२ हजार लिटर स्पिरिट घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर ते अकोला या दरम्यान पाळत ठेवून स्पिरिट घेऊन जाणारा ट्रक मूर्तिजापूरजवळील एका ढाब्यावर जप्त केला. या ट्रकमधील १२ हजार लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले असून, सदर स्पिरिटची किंमत तब्बल १५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. या ट्रकचा चालक पिन्नर पेरुमल तेलवन आणि क्लिनर सत्तार अब्दुल रहिम या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दाघांचीही पोलीस कोठडीत रवानगी केली. या स्पिरिटचा छत्तीसगडमधील विक्रेता व गोवा किंवा अकोल्यातील खरेदीदार तसेच त्यांचा दलाल या तिघांचा शोध उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरू केला आहे.

बडे मासे लागणार गळाला!स्पिरिटची वाहतूक करणार्‍या चालक व क्लीनरची चौकशी करण्यात येत आहे; मात्र भाषेची अडचण दुसर्‍या दिवशीही कायम असल्याने अधिक माहिती समोर आली नाही; मात्र भाषेचा अनुवाद करणारा मिळाल्यानंतर सदर प्रकरणातील दोषींचे चेहरे समोर येणार असल्याची माहिती आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल आणि योग्यरीत्या तपास झाल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस