‘स्पीड गन’ने रोखला चार हजार वाहनांचा वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:49+5:302021-02-05T06:17:49+5:30
अकाेला : अकाेला पाेलीस दलामध्ये वाहतूक शाखेत गतवर्षी दाखल झालेल्या स्पीड गन कारमुळे तब्बल तीन हजार ९३५ वाहनांचा वेग ...

‘स्पीड गन’ने रोखला चार हजार वाहनांचा वेग !
अकाेला : अकाेला पाेलीस दलामध्ये वाहतूक शाखेत गतवर्षी दाखल झालेल्या स्पीड गन कारमुळे तब्बल तीन हजार ९३५ वाहनांचा वेग राेखला गेला. या स्पीड गनमुळे अतिवेगात जाणाऱ्या वाहनांचा वेग तपासून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता आली. यातील सर्वाधिक कारवाई ही फेबुवारी महिन्यात करण्यात आली असून, तब्बल एक हजार १२४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये त्याखालाेखाल म्हणजेच एक हजार १२१ वाहनांवर कारवाई करून वाहतूक शाखेने अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाई करत अकाेला पाेलीस क्रमांक एकवर असल्याचे दाखवून दिले. मात्र, त्यानंतर काेराेनाचे संकट आले. लाॅकडाऊन सुरु होताच कारवाईचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यात केवळ चार वाहनांवर तर मे महिन्यात केवळ एका वाहनावर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यानंतर जून महिन्यात १३ तर जुलै महिन्यात ५१ वाहनांवर कारवाई करून वाहतूक शाखेने पुन्हा कारवाईचा सपाटा सुरु केला. नाेव्हेंबर आणि डिसेंबर या दाेन महिन्यात पुन्हा एक हजारांच्या आसपास वाहनांवर कारवाई करून स्पीड गनने अकाेला पाेलिसांची शान वाढवली. अॅंटिसेप्टर वाहनातील स्पीड गनमुळे वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची एक सुविधा वाहतूक शाखेला उपलब्ध झाली आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
वर्षभरात केलेली कारवाई
जानेवारी - ५३२
फेब्रुवारी - ११२४
मार्च - ११२१
एप्रिल - ४
मे - १
जून - १३
जुलै - ५१
ऑगस्ट - १००
सप्टेंबर - ७६
ऑक्टोबर - १३२
नोव्हेंबर - ३६३
डिसेंबर - ४१८
एकूण - ३,९३५
धावत्या वाहनांचा असा मोजला जातो वेग
वाहनातील स्पीड गनच्या रेंजमध्ये वाहन आले की, वाहनाची नंबरप्लेट स्पष्ट दिसेल अशाप्रकारे स्पीड गनमधील लेझर लाईट मारून वेगाची तपासणी केली जाते, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेग असला की, बटन क्लिक केले की, चालान आपोआप तयार होऊन सर्व माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक, मुंबई यांच्या कार्यालयात जाते व तेथील कर्मचारी या माहितीची पडताळणी करून चालान अंतिम करतात. त्यानंतर संबंधित अधिकृत गाडी मालकाच्या मोबाईलवर चालान आणि दंडाची संपूर्ण माहिती पाठवली जाते. ही दंडाची रक्कम कोणत्याही ठिकाणी ई-चालान मशीनद्वारे भरली जाऊ शकते.
काेट
रस्ते अपघात होण्यामागील प्रमुख घटकापैकी अतिवेगाने वाहन चालविणे हा एक प्रमुख घटक आहे, यासाठी उपलब्ध अँटिसेप्टर वाहनातील स्पीड गणचा वापर करून वेग मर्यादा ओलांडणाऱ्या हजारो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दंडही गाेळा झाला असून अतीवेगात वाहने चालविणाऱ्यावर नियंत्रणही आले आहे. स्पीड गनव्दारे कारवाइचा सपाटा यापुढेही सुरु राहणार आहे.
गजानन शेळके
वाहतुक शाखा प्रमूख अकाेला