पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा जुगार अड्ड्यांवर छापा

By Admin | Updated: July 12, 2017 01:46 IST2017-07-12T01:46:43+5:302017-07-12T01:46:43+5:30

अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी शहरातील संत तुकाराम चौक आणि टॉवर चौकातील जुगार अड्ड्यावर छापा घालून पाच जणांना अटक केली.

Special Superintendent of Police Superintendent of the Gambier | पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा जुगार अड्ड्यांवर छापा

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा जुगार अड्ड्यांवर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी शहरातील संत तुकाराम चौक आणि टॉवर चौकातील जुगार अड्ड्यावर छापा घालून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १२ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे व त्यांच्या पथकाने संत तुकाराम चौक येथील जुगारावर छापा टाकून शेख अकबर शेख असदउल्ला, गजानन रमेश मोतळकर, मनोहर तुळशीराम चव्हाण, यांना रंगेहात अटक करून त्यांच्याकडून वरली जुगाराच्या चिठ्ठ्या, रोख १२ हजार ५00 रुपये जप्त केले. दुसरी कारवाई टॉवर चौकातील गोपाल टॉकीजच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केली.
जुगार अड्ड्यावर छापा मारून विशेष पोलीस पथकाने श्यामराव तोताराम पांडव, अशोक गणपत तायडे यांना अटक केली. त्यांच्याकडून २ हजार २00 रुपये, असा एकूण १४ हजार ७00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Special Superintendent of Police Superintendent of the Gambier