विशेष पथकाने केला दारूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 19:43 IST2017-09-24T19:37:31+5:302017-09-24T19:43:23+5:30

अकोला - उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथून  देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत  असलेल्या एका इसमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे  यांनी पकडून त्याच्याकडून तब्बल ६0 हजार रुपयांचा दारू  साठा जप्त केला आहे.

Special squad seized liquor stock | विशेष पथकाने केला दारूचा साठा जप्त

विशेष पथकाने केला दारूचा साठा जप्त

ठळक मुद्देउरळ परिसरात केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथून  देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत  असलेल्या एका इसमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे  यांनी पकडून त्याच्याकडून तब्बल ६0 हजार रुपयांचा दारू  साठा जप्त केला आहे.
गायगाव येथून एक इसम एम एच ३0 एयू १४५१ क्रमांकाच्या  दुचाकीवर देशी व विदेशी दारूचा साठा घेऊन जात  असल्याची माहिती  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश  कलासागर यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना  मिळाली. त्यांनी पथकासह या दारू माफियाचा पाठलाग  करून त्याला ताब्यात घेतले. त्याची दुचाकीवरील पोते व  बॉक्सची झडती घेतली असता, त्यामध्ये दारूचा अवैध  साठा आढळला. त्यानंतर सदर दारू विक्रेत्यास उरळ  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई  जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या पथकाचे  प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह केली.

Web Title: Special squad seized liquor stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.