पातुरातील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:08 IST2018-10-02T18:08:22+5:302018-10-02T18:08:59+5:30
अकोला - पातुर तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी छापा टाकला.

पातुरातील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
अकोला - पातुर तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी छापा टाकला. या ठिकाणावरुन दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पातूर शहरातील महाराष्ट्र गादी कारखाना समोर असलेल्या खुल्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकून पातूर येथील शनिवार पुरा येथील रहिवासी मोहम्मद गफुर मोहम्मद उस्मान व माळराजुरा येथील रहिवासी किरण मोहन जयसिंगकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे व त्यांच्या पथकाने केली.