जुगार क्लबवर विशेष पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 01:32 IST2017-05-25T01:32:21+5:302017-05-25T01:32:21+5:30
आठ लोकांना घेतले ताब्यात; ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुगार क्लबवर विशेष पथकाचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खैर मोहम्मद प्लॉट येथील प्रसिद्ध लढ्ढाच्या जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आठ लोकांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी बुधवारी लढ्ढा क्लबवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी गजानन प्रभाकर नागलकर (४२ रा. मेहर नगर, डाबकी रोड), शरद रिजपाल संगीले (४४ भीमनगर, डाबकी रोड), मिरजा आझाम बेग मिरजा इजाज बेग (२३ खैर मोहम्मद प्लॉट), मोसिन अली फयाज अली (२८ खैर मो. प्लॉट), जमील शेख शेख महेमुद शेख (२३ भगतवाडी), मोहम्मद अली मोहम्मद युसूफ (२८ आरपीटीएस रोड ), मो. रहीस मो. युनूस (४७ नवीन तारफैल), शेख इब्रान शेख हारूम (३० खैर मोहम्मद प्लॉट) यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.