प्रशस्त आणि स्वस्त, हुसैनी मॉलचे उदघाटन थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:57+5:302021-09-14T04:22:57+5:30

अकोला - ग्राहक सेवेत सतत १२० वर्षांपासून अकोलेकरांचा विश्वास संपादन करणाऱ्या हुसैनी परिवाराने शनिवारी (दि. ११) वाशिम बायपास बाळापूर ...

Spacious and cheap, Husseini Mall opens | प्रशस्त आणि स्वस्त, हुसैनी मॉलचे उदघाटन थाटात

प्रशस्त आणि स्वस्त, हुसैनी मॉलचे उदघाटन थाटात

अकोला - ग्राहक सेवेत सतत १२० वर्षांपासून अकोलेकरांचा विश्वास संपादन करणाऱ्या हुसैनी परिवाराने शनिवारी (दि. ११) वाशिम बायपास बाळापूर रोडवर आपले नवीन प्रतिष्ठान हुसैनी मॉलचे उद्घाटन केले. ह्या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारीवर्ग, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुसैनी मॉलची माहिती देताना संचालक एजाज हुसैन, अशफाक हुसैन आणि शाकीर हुसैन, यांनी सांगितले की, हुसैनी मॉल अकोला शहरातील सर्वांत मोठा आणि सर्वांत स्वस्त मॉल आहे. एकाच छताखाली सर्व दैनंदिन लागणारे उपयोगी आयटम्स् उदा. किराणा, कॉस्मॅटीक्स, कटलरी, किचन वेअर, क्रॉकरी, इलेक्ट्रीकल, प्लॉस्टीक आयटम्स स्वस्त दरात उपलब्ध राहणार आहेत.

ग्राहकांच्या सोयींसाठी होम डिलेव्हरीची पण सुविधा राहील. बाळापूर हायवे रोडवर असल्यामुळे बाहेरगांवाहून येणाऱ्या जाणाऱ्या तसेच परिसरातील नागरिकांसाठी हुसैनी मॉलमुळे खरेदीची सोय झाल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

उदघाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी आसिफ हुसैन, नासिर हुसैन, सोहेल हुसैन, आरिफ हुसैन, मनिष अग्रवाल यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Spacious and cheap, Husseini Mall opens