शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उलटले!

By admin | Updated: September 30, 2014 01:59 IST

नुकसानभरपाईला विलंब, शेतक-यांची पुन्हा कृषी कार्यालयावर धडक

अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उलटले असून, सणासुदीच्या दिवसात या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अकोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोमवारी कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. कृषी अधीक्षकांना आकोटहून येण्यास विलंब झाल्याने शेतकर्‍यांनी या ठिकाणी नारेबाजी केली. त्यामुळे काहीवेळ येथे वातावरण तापल्याने कृषी विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले.शेतकर्‍यांनी यावर्षी जिल्हय़ात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीन पेरणीसाठी शेतकर्‍यांनी महाबीजसह बियाणे निर्मिती करणार्‍या इतर २२ कंपन्यांचे बियाणे यावर्षी खरेदी केले होते; पंरतु या सर्व कंपन्यांचे बहुतांश बियाणे उलटल्याने शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे; परंतु शेतकर्‍यांना महाबीजने पन्नास टक्के दिलेली नुकसानभरपाई वगळता इतर खासगी बियाणे कंपन्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे टाळत असल्याने शेतकरी नेते मनोज तायडे यांच्या नेतृत्वात अकोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. ४ ऑक्टोबरला याबाबत तोडगा काढण्याचे आश्‍वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिल्याने संतप्त शेतकर्‍यांनी १२ वाजतापासून या कार्यालयावर मांडलेला ठिय्या चार वाजता उठवला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची उपस्थिती होती. या दोन्ही नेत्यांनी शेतकर्‍यांना शांत केले.