सोयाबीन बियाणे निकृष्ट
By Admin | Updated: July 26, 2014 21:01 IST2014-07-26T21:01:58+5:302014-07-26T21:01:58+5:30
अनेक ठिकाणी बीजे अंकुरली नाही

सोयाबीन बियाणे निकृष्ट
बाभुळगाव जहागीर: गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होत असून, यंदा पेरण्यात आलेले सोयाबीन बियाणे पूर्णपणे उगवलेच नसल्याचे बाभुळगाव जहागीरसह परिसरातील अनेक शेतकर्यांनी सांगितले आहे. अकोला तालुक्यात शेतजमिनीचे क्षेत्र तब्बल ९६ हजार हेक्टर आहे. त्यावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. पावसाला बराच विलंब झाल्याने मूग, उडीद, ज्वारी, तूर, आदी पिक ांची वेळ निघून गेली. शेतकर्यांसमोर सोयाबीन किंवा कपाशीची पेरणी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. गेल्या आठवड्यात बर्यापैकी पाऊस पडल्याने बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु ५ ते ६ दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बीजे पूर्णपणे अंकुरलीच नाही. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. तब्बल अडीच हजार रुपये प्रती बॅग अशा दराने खरेदी केलेले हे बियाणे उगवलेच नसल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. आता या सर्व शेतक र्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते, हे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांचा दर्जा खालावला असून, शेतकर्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असा सल्ला कृ षी विभागाकडून देण्यात आला होता. तो खरा ठरल्याचे दिसत आहे.