दुचाकी-टॅंकरच्या अपघातात जावई- मेहुणा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:31+5:302021-07-29T04:20:31+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील खरब-खरबडी, हेंडज दरम्यान दोघे दुचाकीस्वार टॅंकरखाली आल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि. २८ ...

Son-in-law killed in two-wheeler accident | दुचाकी-टॅंकरच्या अपघातात जावई- मेहुणा ठार

दुचाकी-टॅंकरच्या अपघातात जावई- मेहुणा ठार

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील खरब-खरबडी, हेंडज दरम्यान दोघे दुचाकीस्वार टॅंकरखाली आल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची घटना दि. २८ जुलै रोजी रात्री ८:१५ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असल्याने अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. बुधवारी अपघातात जावई-मेहुणा दोघे जण घटनास्थळीच ठार झाले. प्रेम पांडुरंग गेडाम (३८) (रा. सांजापूर, गोरेगाव पुंडलिक महाराज) व अमरावती येथील प्रेम गेडाम यांचा मेहुणा हे दोघे जावई-मेहुणे (एमएच २७ एके १७७८) क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या टॅंकर क्रमांक (सीजी १५ डीसी १९४७) च्या मागच्या चाकात दुचाकीसह आल्याने चिरडून दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस व वंचित आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. अपघातानंतर काही काळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Son-in-law killed in two-wheeler accident