आगीचे गोळे पडल्याने मुलगा जखमी

By Admin | Updated: March 21, 2017 02:24 IST2017-03-21T02:24:05+5:302017-03-21T02:24:05+5:30

१२ वर्षीय मुलगा विद्युत तारांच्या स्पार्किंंंंगमधून पडलेल्या गोळ्य़ांनी भाजल्या गेल्याची घटना २0 मार्च रोजी दुपारी घडली.

Son injured in fire | आगीचे गोळे पडल्याने मुलगा जखमी

आगीचे गोळे पडल्याने मुलगा जखमी

महान(अकोला), दि. २0-येथून जवळच असलेल्या हातोला येथील १२ वर्षीय मुलगा विद्युत तारांच्या स्पार्किंंंंगमधून पडलेल्या गोळ्य़ांनी भाजल्या गेल्याची घटना २0 मार्च रोजी दुपारी घडली.
हातोला येथील सौरभ गजानन काजे हा आपल्या शेतातील निंबाच्या झाडाखाली बसून शेताची रखवाली करत होता. तेवढय़ात अचानक विद्युत खांबावर पाकिर्ंग होऊन छर्रा टाइप गरम गोळे अंगावर पडून सौरभ हा जखमी झाला. जखमी सौरभला तेव्हा तत्काळ महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची शिरभाते यांनी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सवरेपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले.

Web Title: Son injured in fire