नगरसेविकेच्या मुलाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 02:17 IST2017-06-16T02:17:53+5:302017-06-16T02:17:53+5:30

अकोट : अकोट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास दमदाटी करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यात चेतन कैलास मर्दाने याला अकोट शहर पोलिसांनी १५ जून रोजी अटक केली आहे.

The son of the corporator's son is in police custody | नगरसेविकेच्या मुलाला पोलीस कोठडी

नगरसेविकेच्या मुलाला पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास दमदाटी करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यात चेतन कैलास मर्दाने याला अकोट शहर पोलिसांनी १५ जून रोजी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चेतन मर्दाने हा प्रभाग क्र.१६ च्या भाजपा नगरसेविकेचा मुलगा आहे. शहरातील वराह पकडण्याच्या कारणावरून चेतन मर्दाने याने आरोग्य विभागातील शिपाई सुनील बबन भागवत यांना शासकीय कर्तव्यावर असताना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली व मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद १३ जून रोजी अकोट पोलिसात दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चेतन मर्दाने याच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा निषेध करीत नगर परिषद कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले होते.

Web Title: The son of the corporator's son is in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.