आज होणार विद्युत पुरवठा सुरळीत

By Admin | Updated: June 4, 2014 01:25 IST2014-06-03T22:42:13+5:302014-06-04T01:25:04+5:30

अकोला अदानी विद्युत प्रकल्पाचा बंद पडलेला संच सुरू; आजपासून विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.

Solid power supply will be done today | आज होणार विद्युत पुरवठा सुरळीत

आज होणार विद्युत पुरवठा सुरळीत

अकोला: अदानी विद्युत प्रकल्पाचा बंद पडलेला संच सुरू होणार असून, केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधूनही वीज मिळणार असल्याने आजपासून विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.
गत काही दिवसांपासून अकोला जिल्‘ातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातील काही भागात तर ५ ते ८ तास विद्युत पुरवठा खंडित व्हायचा. तसेच संपूर्ण राज्यातही विजेची मागणी वाढली होती.
दरम्यान, महावितरणने मंगळवारी प्रसिद्ध पत्रक जारी केले. रात्री अदानी प्रकल्पाचा ६६० मेगावॅटचा बंद पडलेला प्रकल्प सुरू होणार आहे. तसेच केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून सुमारे १२०० मेगावॅट वीज घेण्यात आलेली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यूचा ३०० मेगावॅटचा संचही सुरू झालेला आहे. त्यामुळे उद्यापासून वीज पुरवठ्यात सुधारणा होईल, असेही महावितरणने कळविले आहे. रविवारी अदानी प्रकल्पाचे ६६० आणि इंडिया बूल्सचा २७५ मेगावॅटचे दोन संच बंद झाले होते. त्यापैकी प्रत्येकी एक संच पूर्ववत झालेला आहे. अदानीचा दुसरा प्रकल्प ५ जून रोजी कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

Web Title: Solid power supply will be done today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.