भावाच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या सैनिकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 20:06 IST2020-12-08T20:01:10+5:302020-12-08T20:06:04+5:30
Accident News, Akola अमोल चौथमल यांचा जागीच मृत्यू झाला.

भावाच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या सैनिकाचा अपघातात मृत्यू
बोरगाव मंजू: खदानीत झालेल्या बारूदच्या स्फोटात चुलत भाऊ ठार झाल्याची माहिती मिळताच, त्याच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या दुचाकीने जाणाऱ्या सैन्य दलातील जवानाचा अपघातात करूण अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बाभुळगावजवळील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली. या दोन्ही घटनांमुळे चौथमल कुटूंबावर दु:खांचा डोंगर कोसळला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या परिसरात शिवशक्ती स्टोन क्रशरच्या खदानीत खाेदकाम सुरू असते. त्यासाठी येथे बारूद पसरविली जाते. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगरात राहणारा पवन नीळकंठ चौथमल आणि आकाश शालिग्राम इंगळे हे खदानीत खोदकाम करीत असताना, अचानक खदानीत बारूदचा स्फोट झाला. यात स्फोटात पवन चौथमल व आकाश इंगळे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान पवन चौथमल याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच, सैन्यदलातील त्याचा चुलत भाऊ अमोल अशोक चौथमल हे एमएच २७ एक्यु ६५९४ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्याकडे येत असताना, बाभुळगावजवळील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बाभुळगावजवळील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर जड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात अमोल चौथमल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अमोल यांच्या दुचाकीची मोडतोड झाली. अपघाताची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवोर्पचार रूग्णालयात पाठविण्यात आला. अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.